Share

जखम पाकिस्तानी दहशतवाद्यांना झाली आहे , पण विव्हळत मात्र  कॉंग्रेस नेते आहेत : मुख्तार अब्बास नकवी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर खोटारड्या पाकिस्तानला भारताने चांगलेच तोंडघशी पाडले. पण भारतातल्या काही नेत्यांना मात्र या हवाई हल्ल्या संदर्भात प्रश्न पडले असून आता ते हळूहळू बाहेर येवू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवरच भाजपच्या एका नेत्याने कॉंग्रेसवर चांगलीच सडकून टीका केली आहे.भारताने केलेल्या प्रतीहल्ल्यात जखम पाकिस्तानी दहशतवाद्यांना झाली आहे , पण विव्हळत मात्र  कॉंग्रेस नेते आहेत. अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्या एका नेत्याने सरकारकडे एअर स्ट्राईक संदर्भात पुरावे मागितले होते, यावर मुख्तार अब्बास नकवी यांनी ट्विटरवर ट्विट ‘भारताने केलेल्या प्रतीहल्ल्यात जखम पाकिस्तानी दहशतवाद्यांना झाली आहे , पण विवळत मात्र कॉंग्रेस नेते आहेत.’ असे ट्विट केले आहे.

दरम्यान बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावर विरोधकांनी शंका व काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईक याला एक राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. यासाऱ्या प्रकाराचा फायदा मात्र दुसरीकडे पाकिस्तानी मिडिया घेत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!