Share

बंदची ढोंगबाजी जनतेने नाकारली, गुंडागर्दी करुन दुकाने बंद केली; भाजपचे ठाकरे सरकावर ताशेरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ‘#महाराष्ट्र_बंद’ची हाक दिली आहे. या बंदला भाजपने विरोध केला असून सत्ताधारी नेत्यांवर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका टिपण्णी सुरु आहे. त्यावर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

महाभकास आघाडीने लखीमपूरच्या घटनेचं भांडवल करत आधीच बंद असलेला महाराष्ट्र आज प्रयत्न केला. लोकांनी ही बंदची ढोंगबाजी नाकारली. लोकांना महिती आहे की हे महाविकास आघाडीचे राजकारण करत आहेत, असं म्हणत अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

काही ठिकाणी गुंडागर्दी करुन पोलिसांच्या मदतीने धाक दाखवून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. तोही यशस्वी झाला आहे.  येत्या तीन दिवसांत मी ठाकरे सरकारने बेकायदेशीर बंद पुकारला याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेचं झालेलं नुकसान भरपाई आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या खिशातून द्यावी यासाठी मुंबई उच्च न्यायलयामध्ये दाद मागणार आहे, असंही भातखळकर म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!