नवी दिल्ली : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या हिंदू तरुणीने देशातील सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवले आहे. २७ वर्षीय डॉक्टर सना रामचंद गुलवानीने सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेसची (सीएसएस) परीक्षा उत्तीर्ण झाली होती. परंतु आता त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सना मूळची सिंध प्रांतातील शिकारपूरची रहिवासी आहे. त्यांनी सिंधच्या ग्रामीण भागात असूनही जिद्दीने यश मिळवले. ही जागा पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेअंतर्गत येते.
डॉ. सना रामचंद गुलवानी हिने मे महिन्यातच सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवलं होतं. परंतू आता तिची नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा पाकिस्तानात सर्वात कठीण मानली जाते. यातूनच शासकीय सेवा, प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त्या होतात. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारताच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा घेतली जाते.
यशाबद्दल सना म्हणाली, मी खूप आनंदी आहे. हा माझा पहिला प्रयत्न होता. मला त्यात यश मिळवायचे होते. त्यासाठी मी दृढसंकल्प केला. सुरुवातीपासून कठोर परिश्रम करत आले आहे. आई-वडिलांना मी प्रशासकीय क्षेत्रात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्यांना मी मेडिकल व्यवसायात जावे असे वाटत होते. परंतु मी दोन्हीही गोष्टी साध्य केल्या. आई-वडिलांचेही स्वप्न साकार करू शकले. सीएसएसची परीक्षा उत्तीर्ण करून गृहितक मोडित काढले आहे. आता मी वैद्यकीय व्यवसायाबरोबरच प्रशासकीय सेवेचाही भाग असेल.
पाच वर्षांपूर्वी सनाने शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिनमधील पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर ती आता सर्जनही आहे. पाकिस्तानमध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळी घेतले जातात. तिच्याकडे यूरोलॉजीचीही पदवी आहे. यानंतर तिने आता फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची तयारीही सुरू केलीय.
पाकिस्तानात सर्वात अवघड परीक्षा
पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे. सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेस म्हणजेच पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेतील नियुक्तींची परीक्षा असून भारतातील युपीएससी दर्जाची तुलना या परीक्षेसोबत करता येईल. सनाने सिंध प्रांतातील रुरल जागेतून परीक्षेत सहभाग घेतला होता. पाकिस्तान प्रशासकीय सर्व्हिसेसच्या अंतर्गत ही जागा भरण्यात येते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘किरीट सोमय्या हे तर भाजपचे शक्ती कपूर’, चंद्रकांत खैरेंचा टोला
- ‘दरेकर काहीच चुकीचे बोलले नाही, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
- ‘महाराष्ट्र पोलिसांचे राजकीयकरण; पोलिसांनी त्यांचे उत्तम असलेले नाव जपले पाहिजे’
- मोठी बातमी! अजित पवारांकडून तत्काळ सैन्य भरतीबाबत प्रशासनाला निर्देश
- …तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध कशी करणार? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल


