Share

‘किरीट सोमय्या हे तर भाजपचे शक्ती कपूर’, चंद्रकांत खैरेंचा टोला

Published On: 

औरंगाबाद : किरीट सोमय्या यांना भाजपकडून सोडण्यात आलेले आहे. सोमय्याने कितीही काड्या केल्या तरीही त्याच्याकडे कुठलेही पुरावे नाही. सोमय्या हे भाजपचे शक्ती कपूर आहेत. त्यांना हे नाव मी लोकसभेत दिले होते. शक्ती कपूर ज्याप्रमाणे भॉ भॉ करतात त्याचप्रमाणे सोमय्या देखील भुकत असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लातुर याठिकाणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र भाजपच्या किरीट सोमय्या यांनी सुरू ठेवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी, मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह एकूण १२ जणांनी विविध भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडायला सुरुवात केल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, सोमय्या यांना शिवसेनेवर टीका करण्यासाठी विशेषतः भाजपकडून सोडण्यात आलेले आहे. मी स्वतः लोकसभेत असतांना सोमय्या यांना शक्ती कपूर हे नाव बहाल केले होते. शक्ती कपूर या खलनायकाप्रमाणे ते नेहमी भॉ भॉ करत असतात. अशी टिका चंद्रकांत खैरे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलतांना सोमय्यांवर केली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!