Share

‘हिमालय संवेदनशील स्थान आहे तेथे जलविद्युत प्रकल्प उभारायला नको होते’

Published On: 

नवी दिल्ली: देवभूमी उत्तराखंडवर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. चमोली जिल्ह्यात ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्याची घटना घडली आहे. जोशीमठच्या रेणीतील ऋषीगंगा प्रोजेक्टजवळ ग्लेशियर कोसळला आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने तपोवनमध्ये वीज प्रकल्प वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

तर, ऋषीगंगा प्रोजेक्टचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.

जोशीमठपासून 25 कि.मी. अंतरावर पांग गावात एक प्रचंड हिमनग कोसळला. त्यामुळे धौली नदीला पूर आला. यानंतर हिमस्खलन झाले आणि नदीच्या पुरामुळे ऋषीगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले. काही पूलांचे देखील यामुळे नुकसाना झालं आहे. हिमकडा कोसळल्यानंतर चमोली जिल्ह्यात आलेल्या पुरात १००-१५० नागरिक वाहून जाऊन दगावल्याची शक्यता असल्याचं उत्तराखंडाचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजप खासदार उमा भारती यांनी स्वत: मंत्री असताना गंगा नदी आणि त्याच्या मुख्य उपनद्यांवर धरणं बांधून वीजनिर्मिती करण्यास विरोध होता असं म्हटलं आहे. ‘जोशीमठापासून 24 किलोमीटर दूर असणाऱ्या चमोली जिल्ह्यातील पँग गावाजवळ हिमकडा तुटल्याने ऋषिगंगा नदीवर बनवण्यात आलेला वीजप्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला. या पुराचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. मी गंगा मातेला प्रार्थना करते की तिने सर्वांचं रक्षण करावं. तिने सर्व प्राण्यांचे संरक्षण करावं अशी मी प्रार्थना करते’ असं ट्विट केलं आहे.

‘काल मी उत्तरकाशीमध्ये होते आज हरिद्वारला पोहचले आहे. हरिद्वारमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ या प्रलयाचा फटका हरिद्वारलाही बसू शकतो. ऋषिगंगा नदीवर झालेला हा अपघात हा चिंतेचा विषय असून यामधून इशारा मिळत आहे’ असं देखील उमा यांनी म्हटलं आहे. ‘मी जेव्हा मंत्री होती तेव्हा मी माझ्या मंत्रालयाच्या वतीने उत्तराखंडमध्ये हिमालयातून येणाऱ्या नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या धरणांबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं त्यामध्ये हिमालय हे खूपच संवेदनशील ठिकाण असून गंगा आणि तिच्या प्रमुख उपनद्यांवर वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधली जाता कामा नये असं म्हटलं होतं’ अशी माहिती उमा भारती यांनी दिली आहे.

‘धरणं न बांधल्याने उत्तराखंडला 12 टक्के कमी वीज मिळते ती राष्ट्रीय ग्रीडमधून पुरवण्यात यावी’ असंही त्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचं उमा भारती यांनी सांगितलं. तसेच या दूर्घटनेमुळे मी खूप दु:खी आहे. उत्तराखंड ही देवभूमि आहे. येथील लोकं खूप कठीण परिस्थितीमध्ये राहत असून तिबेटला लागून असलेल्या भारताच्या सीमांचे संरक्षण करतात. त्या सर्वांच्या रक्षणासाठी मी देवाकडे प्रार्थना करते असं उमा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!