परतूर : परतूर आणि मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल रात्री गारपीट झाली असून अनेक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीमुळे हिरावून घेतला गेला आहे प्रचंड खर्च करून हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेले पिक अंतिम टप्प्यात गारपिटीमुळे वाया गेलेले आहे आपण कायम शेतकऱ्यांची भूमिका मांडत आलो आहोत त्यामुळे गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री महसूलमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले
सकाळी 10 वाजता मतदार संघात गारपीट झाली असल्याची माहिती लोणीकर यांना मिळाली आणि क्षणाचाही विलंब न लावता 11 वाजता बबनराव लोणीकर यांनी वाटूर आणि पिंपरखेडा गरड येथील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी गणपतराव वारे विक्रम माने बद्रीनारायण खवणे उद्धवराव वायाळ संभाजी वारे माधवसिंग जनकवार माजी सभापती रामेश्वर तनपुरे पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले तहसीलदार रुपाली चित्रक यांची यावेळी उपस्थिती होती
पिंपरखेडा गरड तालुका परतुर येथील मिरची उत्पादक शेतकरी राजू माने यांच्या मिरची या उत्पादनाचे प्रचंड नुकसान झाले असून लाखो रुपयाचे पीक या गारपिटीमुळे वाया गेले आहे त्याचबरोबर भिकाजी चींचाने यांच्या शेतातील द्राक्ष बागेची लोणीकर यांनी पाहणी केली या द्राक्ष बागेची देखील प्रचंड नुकसान झाले असून लावलेला खर्चदेखील निघणार नाही अशी प्रतिक्रिया यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी भिकाजी चींचाने यांनी दिली वाटूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबासाहेब राऊत यांनीदेखील द्राक्ष बागेची पाहणी करताना लोणीकर यांना विनंती केली की लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्न करावा आपण महाराष्ट्रात मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेला आम्हाला तात्काळ मदत मिळत होती आता देखील त्याच तत्परतेने मदत मिळावी अशी अपेक्षा बाबासाहेब राऊत यांनी यावेळी व्यक्त केले या वेळी परतूर आणि मंठा तालुक्यातील परिसरात कांदे वांगे द्राक्ष मिरची डाळिंब यासारख्या अनेक पिकांचे या गारपिटीमुळे नुकसान झाले असल्याचे देखील स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी लक्ष्मणराव खवणे, रुस्तुमराव पुंड, भास्करराव हजारे, बंडू मुळे, वसंतराव राजबिंडे, गजानन वायाळ, प्रकाश मुळे, उमेश माथने, अजय तरसे, शुभम आढे, दामोदर चांदणे, राम शिंदे, रामदास माने, गजानन माने, राजू माने, शिवाजी चिंचणे, लक्ष्मण शिंदे, भरत हजारे मंडळ अधिकारी कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


