Share

अजूनही सामूहिक नमाज पठण सुरूचं ; कुठे घडला हा प्रकार ‘ हे ‘ जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेले १ महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. तसेच, बाकी विकसित राष्ट्रापेक्षा भारतातील परिस्थिती हि आटोक्यात असल्याचे म्हणले जात असले तरी धोका मात्र कमी नाही. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन पासुन वा त्या आधीच धार्मिक स्थळ हे बंद करण्यात आले होते. देशातील अनेक सण, उत्सव हे रद्द केले गेले होते.

मात्र, काहींना याचे तिळभर देखील गांभीर्यता नसल्याचे दिसून येत आहे. वारंवार मोठं मोठ्या धर्मगुरू यांनी या बाबत आवाहन करून देखील काही ठिकाणी एकत्र येऊन नमाज पठणाचे आयोजन केल्याच्या घटना अजून देखील समोर येत आहेत.

शुक्रवारी रतलाम मधील उंकाला रोड वरील मशिदीमध्ये सामुहिक नमाज पठण करताना काही व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या मशिदीमध्ये सामुहिक नमाज पठण होणार असल्याची माहिती तेथील प्रशासनाला मिळाली होती.

या सुचनेच्या आधारे पोलीस आणि काही अधिकारी या वेळी पोहोचले असता नमाज पठण चालू होते. पोलिसांना बघून अनेकांनी पळ काढला तर ताब्यात घेतलेल्याना पोलिसांनी दणका देत आपल्या सोबत घेऊन गेल्याची माहिती NDTV INDIA या न्यूज चॅनेल ने दाखवलेल्या बातमीनुसार मिळते आहे.

या आरोपींविरोधात आईपीसी कलम १८८, २६९, २७० नुसार खटला दाखल करण्यात आला आहे. ६ आरोपींना सैलानी जेल मध्ये पाठवले आहे.
दरम्यान, देशात एकूण १४ हजारहुन अधिक कोरोना बाधित आढळले असल्याने, लोकांनी अधिक काळजी घेऊन सुरक्षित राहणे गरजेचे आहे.तरचं करोना आटोक्यात येऊ शकतो.नाहीतर ही साखळी अशीच सुरू राहिलं.

https://youtu.be/JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!