Share

राज्यपालांनी सरकारला चूक लक्षात आणून दिली, नाहीतर…- फडणवीस

Published On: 

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता निकाली लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले होते. ओबीसी आरक्षण अध्यादेश ठाकरे सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालायत हे प्रकरण असल्याच सांगत राज्यपालांनी राज्य सरकारकडे कायदेशीर खुलासा मागितला. या अध्यादेशावर राज्यपालांनी शंका उपस्थित करत राज्य सरकारला कायदेशीर खुलासा करण्यास सांगितला होता.

यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘राज्य सरकारकडून सुरुवातीला आलेल्या अध्यादेशात काही त्रुटी होत्या. तो अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला असता, तरी न्यायालयाकडून त्यावर स्थगिती आली असती. ही चूक राज्यपालांनी सरकारच्या लक्षात आणून दिली’, असं फडणवीस म्हणाले. तसेच, सुप्रीम कोर्टात केंद्रानं वेळ वाढवून मागितली नसून राज्य सरकारनंच वेळ वाढवून घेतलीय, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!