Share

‘पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे; मदत सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही तत्पर’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत योग्य मदत करण्यासह दुरोगामी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, पूरग्रस्तांना सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा होती. यासाठी निकष बदलून अधिक मदत करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी दिले होते. आता राज्य सरकारतर्फे पूरग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलंय.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

हे पॅकेज जाहीर केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून लवकरात लवकर ही मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असं म्हटलं आहे. ‘पूरग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून आज ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. ही मदत सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत नेमकी कशी ?

सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन १० हजार रुपये करत आहोत. दुकानदारांसाठी ५० हजार रुपये आणि टपरी धारकांसाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर्ण घर पडलं असल्यास १ लाख ५० हजार रुपये, ५० टक्के घर नुकसान झालं असल्यास ५० हजार रुपये आणि २५ टक्के नुकसान झालेल्या घरासाठी २५ टक्के तर अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान १५ हजार रुपयांची घोषणा जाहीर करण्यात आली आहे.

शेती नुकसानाचा प्राथमिक अंदाज आला आहे. प्राथमिक माहितीनुसार ४ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. मत्स्य व्यवसाय, एमएसईबी विभागाचं, ग्रामीण विकास या भागांसाठीही मदत केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २५०० कोटी रुपये, नगर विकास विभागानं दिलेल्या नुकसानाचाही या एकूण पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. दुकानं आणि टपऱ्यांची संख्या १६ हजार आहे. याशिवाय, खरडून गेलेली शेतजमीन ३० हजार हेक्टर आहे. त्यासाठीच्या एनडीआरएफच्या निकषांमध्ये अधिकचे पैसे टाकून मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बागायती, जिरायतीसाठी सविस्तर निर्णय जाहीर करण्यात येतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!