Share

गोड बातमी : आता लवकरच महागडय़ा औषधांच्या किमती कमी होणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ड्रग प्राइस रेग्युलेटर, फार्मा लॉबी ग्रुप आणि उद्योग संघटनांच्या दरम्यान नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ट्रेड मार्जिनवर चर्चा झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या व्यापारी नफा (ट्रेड मार्जिन) 30 टक्के ठेवण्याच्या प्रस्तावावर ड्रग इंडस्ट्रीने तयारी दाखवली आहे. येत्या काही दिवसांत महागडय़ा औषधांच्या किमती 80 टक्के कमी होणार आहेत.

याबद्दल माहिती देताना इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपनाथ राय चौधरी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ” या प्रस्तावाबद्दल आम्हाला काहीच अडचणी नाहीत. कॅन्सरच्या औषधांवर ट्रेड मार्जिन 30 टक्के निश्चित करण्यात आले आहे. ते देखील योग्य आहे. जर अन्य उत्पादनांवर हे लागू करण्यात येत असेल तर त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी.

त्याचप्रमाणे फिलिप कॅपिटलचे फार्मा ऍनालिस्ट सूर्या पात्रा यांनीदेखील याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ” किमती नियंत्रणाबाहेर असलेल्या औषधांवर 30 टक्के ट्रेड मार्जिन आधीपासूनच आहे. किरकोळ विक्रेत्यांना 20 टक्के तर घाऊक विक्रेत्यांना 10 टक्के आहे. त्यामुळे नवा प्रस्ताव लागू झाल्यावर औषधांच्या किमती फार कमी होणार नाही. औषध कंपन्या विक्रेत्यांना ज्या किमतीत औषधे विकतात आणि ग्राहकांना दुकानात ज्या किमतीत औषधे मिळतात त्यातील फरक म्हणजे व्यापारी नफा असतो.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे सन फार्मा, सिप्ला, ल्यूपिन या मोठय़ा औषध कंपन्यांवर परिणाम होईल. कारण त्यांना कमाल घाऊक किमतीत कपात करावी लागेल. मॅनकाइंट फार्माचे संचालक आर. सी. जुनेजा यांनी व्यापारी नफा 30 टक्के निश्चित करण्याचा प्रस्ताव म्हणजे ग्राहकांसाठी फायदेशीर असून ड्रग इंडस्ट्रीला पाठबळ देणारा असल्याचे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1199935477878419456?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1199939136418795520?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!