Share

स्वर्णकार समाजाला केंद्र सरकारद्वारे न्याय मिळवून देणार -रामदास आठवले

Published On: 

विशाखापट्टणम : ‘जो सोने को देते है आकार नाम है उनका स्वर्णकार’ अशी काव्यमय सुरुवात करून ओबीसी मध्ये येणाऱ्या स्वर्णकार समाजाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी; स्वर्णकार समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.सर्वांना साथ सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास ही मोदी सरकारची भूमिका असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.

विशाखापट्टणम येथे आंध्र प्रदेश सवर्णकार समाजातर्फे रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना रामदास आठवले बोलत होते.यावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून स्वर्णकारांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रक्कमेच्या प्रातिनिधिक धनादेशाचे प्रतिकात्मक वाटप इंडियन बँक आणि बँक ऑफ इंडियातर्फे रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. बी.आय.एस द्वारे हॉल मार्कचा परवाना स्वर्णकार कारागिरांना देण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात बी.आय.एस तर्फे स्वर्णकारांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे;आदी स्वर्णकार समाजाच्या मागण्या असून त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा कर्ज योजना सुरू केल्याने स्वर्णकार समाजातील कारागिरांना लाभ झाला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आभार मानण्यात आले. यावेळी स्वर्णकार समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी करी वेणू माधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते झाला.

विशाखापट्टणम येथे महाराष्ट्रातील सातारा सांगली मधील खानापूर आटपाडी येथील स्वर्णकार कामगार वास्तव्यास आहेत.त्यांची ही यावेळी उपस्थिती होती.रामदास आठवले महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी अनेक चांगली कामे केली. महाराष्ट्रात त्यांच्या कारकिर्दीत सर्वप्रथम महिला आयोगाची स्थापना झाली. आता भारताचे केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आठवले यांचे आभार यावेळी ओबीसी कमिशनचे सदस्य आचारी तल्लूजू यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!