औरंगाबाद : महापालिकेने खान नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेत काम सुरू केले आहे. या उपक्रमाला आता केंद्र शासनाच्या ‘नमामि गंगे’ उपक्रमातून अर्थसाहाय्य मिळणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे. या डीपीआरमध्ये खाम पाठोपाठ शहरातून वाहणाऱ्या सुखना नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा समावेश केला जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
शहरातून वाहणाऱ्या खाम नदीची गटार गंगा झाली होती. ड्रेनेजचे पाणी सर्रास खामनदी पात्रात सोडले जात होते. काही वर्षांपासून खाम नदी पात्रात सौंदर्यीकरणाचे कामे करण्यात आली पण लोखंडी पुलाच्या परिसरातच ही कामे झाली. त्यानंतर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्याला छावणी परिषद, इकोसत्व, व्हेरॉक कंपनीसह नागरिकांनी साथ दिली. त्यानुसार सुरुवातीला खाम नदीपात्रातील प्लॅस्टिक कचरा उचलण्यात आला. त्यानंतर नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात आले. अनेक ठिकाणी पिचिंगची कामे करण्यात आली.
नदीकाठावर असलेल्या संरक्षण भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली. वृक्षारोपणही करण्यात आले. सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या नदीकाठाचे रुप बदलले आहे. दरम्यान केंद्र शासनाने ‘नमामि गंगे’ हा उपक्रम हाती घेतला. पांडेय यांच्या प्रयत्नामुळे औरंगाबाद शहराचा देखील या उपक्रमात समावेश करण्यात आला. महापालिकेला या उपक्रमासाठी केंद्राकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे. इकोसत्व संस्थेमार्फत खाम नदी पुनरुज्जीवनासाठी डीपीआर तयार केल जात आहे. आता खाम नदीसोबतच सुखना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक कामांचा या डीपीआरमध्ये समावेश केला जाईल, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.
तीनशे कोटींवर जाणार डीपीआर
खाम व सुखना नदीच्या पुनरुज्जीवनाचा डीपीआर सुमारे ३०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भविष्यात चांगल्या संस्थेची मदत घेऊन हा डीपीआर तयार केला जाईल, असे पांडेय यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपसोबत युती कायम राहिली असती’
- ‘रोहित शर्मा एक जबरदस्त कर्णधार’
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन
- ‘शिखर धवन लवकरच पुनरागमन करेल’, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केला विश्वास

