🕒 1 min read
औरंगाबाद : आपले औरंगाबाद शहर स्वर्ग झाले आहे, असे मला म्हणायचे नाही. मात्र आपण योग्य दिशेने जात असल्याची पावती मिळाली आहे. या तीन चार रँकिंग दाखवत आहे की आपले भविष्य उज्ज्वल आहे. मोठ्या शहरांशी तुलना करून आपण ही रँकिंग मिळवली आहे. शहराचे नागरिक समाधानी नाहीत. त्यामुळेच आपल्यासाठी नव्या वाटा कायम खुल्या आहेतच. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय बोलत होते.
ईज ऑफ लिव्हिंग (ईओएल) २०२० चा अहवाल गुरुवारी भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास खात्याने जाहीर केला आहे. त्यात औरंगाबादने मागील वर्षीच्या तुलनेत ६३ स्थानावरुन थेट ३४ व्या स्थानी मजल मारली आहे. विशेष म्हणजे जीवन गुणवत्तेत औरंगाबादने पूर्ण देशात १३ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. यावेळी औरंगाबाद शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील ऑनलाईन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आयक्त पांडेय म्हणाले, मागील वर्षी या सर्वेत आपण ९७ व्या क्रमांकावर होतो. त्यादृष्टीने आपण मागील दीड वर्षांमध्ये जे काही काम केले आहे, त्याचमुळे आपल्याला ही झेप घेणे शक्य झाले आहे. अजूनही बऱ्याच गोष्टीत आपण मागे आहोत. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या सर्वेत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये आपण स्थान मिळवू.
पुढील वर्षी पहिल्या दहामध्ये येण्यासाठी मनपा आणि स्मार्ट सिटी ई-गव्हरनन्स, जीआयएस इत्यादी महत्वाचे प्रकल्प राबवणार आहे. या शहरातील नागरिक समाधानी नाहीत त्यामुळे आपण अजून झपाट्याने प्रगती करू. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- सरपंच, ग्रामसेवकासह दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह; निवडणुकीत होता सहभाग
- मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
- ‘कोरोनाला संधी समजून आम्ही पेट्रोल-डिझेलवर कर लावला नाही याचा सार्थ अभिमान’
- जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता; प्रशासनाची कधी?
- ‘ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकामास परवानगीची जबाबदारी देवू नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
