🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण यांच्या मालकीच्या असलेल्या मावळ तालुक्यातील सुदवडी येथील फार्म हाऊसच्या सभोवताली असलेल्या उसाच्या फडाला शनिवारी दि.२९ रोजीसायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली.त्यात एकूण अडीच एकरऊस जाळून भस्मसात झाला,असल्याची माहिती मिळते आहे.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
शेताच्या जवळचं काम करत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून आगीची माहिती मिळताच तळेगाव नगरपरिषद, चाकण एमआयडीसी, पीएमआरडीए आणि तळेगाव एमआयडीसीचे अग्नीशमन बंब रवाना झाले. त्यांच्या अथक प्रयत्नाने आणि तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली. पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव-चाकण महामार्गावरील श्री क्षेत्र भंडारा डोंगर पायथ्यालगत असलेल्या रेनबो फार्मच्या परिसरातील अंदाजे अडीच एकर ऊस जळून खाक झाला.
याबाबत खासदार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सहा एकर ऊस होता. महावितरण कंपनीच्या तारा ट्रीप झाल्यामुळे ही आग लागली. खरे तर आम्ही याबाबत वारंवार महावितरणला पत्र लिहून कळवले होते. आता पुढील कारवाई काय होते याकडे लक्ष ठेऊन आहोत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

