Share

4 मे रोजी होणारी लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही

Published On: 

नाशिक : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवार, 4 मे 2020 रोजी होणाऱ्या जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

नाशिक जिल्हयातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, मे 2020 या महिन्याचा पहिला सोमवार, 4 मे 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृह येथे जिल्हा लोकशाही दिन घेण्यात येणार होता. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे . त्यामुळे सोमवार, 4 मे 2020 रोजी जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, याची जिल्ह्यातील सर्व नगारीकांनी नोंद घ्यावी.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी पूर्ण होईल. दरम्यान, लॉकडाउन संदर्भात ४ मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. तसंच ४ मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!