Share

‘अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रातील सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करत, सरासरी गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्या पार्श्वभूमीतवर अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करण्याची मूळ मागणी मनसे आणि युवा सेनेकडून करण्यात आली होती. त्यामुळं या दोन्ही संघटनांच्या प्रयत्नांना यश आल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, मुख्यमंत्र्यानी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या गुणांवर आधारित सरासरी गुण देउन पास केले जाईल तसेच ज्यांना ग्रेड मध्ये सुधारणा करायची आहे अश्यांना आगामी सत्रात परीक्षा देता येईल असा निर्णय घोषित केला. अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

बेगडे म्हणाले, विद्यापीठ कायदा 2016 नुसार हा निर्णय जाहीर करण्याचा मुख्यमंत्र्याना अधिकार आहे का ? हा निर्णय विद्यापीठ कायद्या नुसार न टिकणारा आहे तसेच एकाच परीक्षेसाठी दुहेरी मापदंड का ? शासनाने घेतलेला हा निर्णय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुर्दैवी असून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारे आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या निर्णयाचा विरोध करत आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?

मी स्वत: सभ्य आहे, याबाबतीत फक्त स्वत:चीच गॅरंटी घेऊ शकतो, पवार-राणे वादावर विखेंचा टोला

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा रद्द करून ग्रेड प्रदान करा : उदय सामंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!