औरंंगाबाद : घाटी रूग्णालयात कार्यरत असलेल्या १६४ कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिल्यानंतर गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेले कंत्राटी कर्मचा-यांचे आमरण उपोषण गुरूवारी (दि.११) स्थगित करण्यात आले.
घाटीतील कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करावे यासाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने नंदाबाई हिवराळे, संगिता शिरसाट, मनिषा हिवराळे, निता भालेराव यांनी आठ दिवसापासून अधीक्षकाच्या दालनासमोर उपोषण सुरू केले होते. याबाबत आयटकचे अभय टाकसाळ यांनी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांना उपोषणाबाबतची माहिती दिली.
डॉ.येळीकर यांनी कंत्राटी कर्मचा-यांना घाटीच्या सेवेत कायम करण्यासाठी शासनाकडे शिफारस करू असे आश्वासन दिल्यावर कर्मचा-यांनी गुरूवारी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी आयटकचे सचिव अभय टाकसाळ, नंदाबाई हिवराळे, संगिता शिरसाठ, मनिषा हिवराळे, निता भालेराव, शृती रूपेकर,राजु हिवराळे आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेससाठी शिवसेनेसोबतची आघाडी ठरतेय अडचणीचा मुद्दा ?
- ‘हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा!’, राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
- रंगत वाढणार! श्रीलंकाविरोधात कर्णधार धवनसोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरण्याची शक्यता
- बाधितांच्या संख्येत घट तरी जालन्यात मृत्यू सत्र सुरुच!
- ‘..म्हणून मोदींनी मार्च महिन्यातच भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले’, काँग्रेसचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

