बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आतापर्यंत महायुतीचा फॉर्म्युला वापरला जात असे. यातून सगळ्याच पक्षातील प्रमुखांना सत्तेत वाटा मिळायचा. यावेळी सेवा संस्था मतदारसंघातील ११ जागांच्या निवडीसाठी एकही उमेदवार पात्र न ठरल्याने केवळ ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान, आठच संचालक निवडले जाणार असल्याने कारभार पाहता येईल की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने सवता सुभा करुन एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.
निवडणूक रिंगणातील बदामराव पंडित एकमेव माजी आमदार आहेत. त्यांची लढत इतर शेती संस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे अमोल आंधळे व भाजपचे धनराज मुंडे यांच्यासोबत आहे. या मतदार संघातून फुलचंद मुंडे, नवनाथ शिराळे, शहादेव हिंदोळे आदी सात अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे इथे अगदीच चुरस पाहायला मिळणार आहे. पगारदार पतसंस्था व नागरी बँक मतदार संघातून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी अपक्ष लढत आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे गंगाधर आगे, भाजपच्या संगीता लोढा व शिवसेनेचे चंद्रकांत सानप यांच्यासोबत असेल.
रंगनाथ धोंडे, सत्यसेन मिसाळ देखील या मतदार संघातून अपक्ष लढत आहेत. प्रक्रिया मतदार संघातून राष्ट्रवादीचे भाऊसाहेब नाटकर यांची लढत भाजपच्या संगीता बडे व शिवसेनेचे जगदीश काळे यांच्यासोबत आहे. इतर मागासवर्ग मतदार संघातून राष्ट्रवादीकडून सावता परिषदेचे कल्याण आखाडे तर भाजपकडून राजेश धोंडे आणि शिवसेनेकडून दिनेश परदेशी रिंगणात आहेत. विमुक्त जाती / भटक्या जमाती मतदार संघातून राष्ट्रवादीकडून सूर्यभान मुंडे तर भाजपकडून श्रीमंत जायभाये शिवसेनेकडून चंद्रकांत सानप रिंगणात आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे महेंद्र गर्जे, वैजिनाथ मिसाळ, वसंत सानप आदी सहा अपक्ष रिंगणात आहेत.
दरम्यान, पतसंस्था/ नागरी बँका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीकडून सुरुवातीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नाव फायनल झाले होते. पण, माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मोदींच्या नावाला विरोध करत गंगाधर आगे यांचे नाव पुढे केले. आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये आगे यांचे नाव आले आणि त्यामुळे मोदींचा पत्ता कट झाला. यानंतर मोदींनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे सोळंके, मोदींमधील वाद समोर आला आहे. मोदींची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य राहिलेले आहे. विद्ममान अध्यक्ष आदित्य सारडा यांनी माघार घेतली असून भाजपकडून संगीता लोढा नशीब आजमावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- फाइलबाबत विचारल्याने महिला लिपिकाने वाहनधारकाला सॅन्डलने झोडपले
- ‘सर्वच नव्हे, ‘या’ सरकारी बँकांचेच होणार खासगीकरण’, सीतारमण यांची महत्त्वाची माहिती
- ‘स्व.गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाला सक्षम केले हा पंकजांचा गैरसमज’, नामदेव शास्त्री महाराजांची टीका
- वेदनेने विव्हळत अखेर ‘त्याने’ घाटीच्या पायरीवर सोडला प्राण
- पेट्रोलिंग करताना पोलिसांच्या गाडीचा अपघात, ७ जण जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
