Share

‘हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना हनुमान चालिसा वाटण्यास सांगितले जात नाही’

Published On: 

रांची : रांची न्यायालयाने दिलेल्या विचित्र निर्णयाची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. रांची महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिचा भारती हिला जामीन मंजूर करण्यासाठी चक्क कुराणच्या ५ प्रतींचे वाटप मुस्लीम संस्थांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

या विद्यार्थिनीला समाज माध्यमांवर पोस्ट टाकून मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अटक करण्यात आली होती. सिव्हिल कोर्टाचे मॅजिस्ट्रेट मनीष सिंह यांनी रिचा भारतील या प्रकरणी जामीन मंजूर केला. त्यासाठी तिला पिठोरिया पोलीस ठाण्याअंतर्गत अंजुमन इस्लामिया समिती येथे कुराणच्या ५ प्रतींचे वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थिनी रिचा भारतीचं नेमकं काय म्हणणे आहे.

‘ही पोस्ट मी स्वतः तयार केली नाही. ती एका माध्यमावर पडली होती. मी केवळ ती फेसबुकवर पुढे पाठवली. शिवाय, यामध्ये मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावतील, असा मजकूर नव्हता. इतर समाजांमधील लोकांच्या पोस्टमुळे आमच्या भावना दुखावतात, तेव्हा त्यांना हनुमान चालिसाची पुस्तके वाटण्यास सांगण्यात येत नाही. हे योग्य नाही.मला माझ्या देवांविषयी बोलण्याचा अधिकार आहे. हा निर्णय म्हणजे माझ्या मूलभूत अधिकाराचा भंग आहे. मी न्यायालयाचा सन्मान करते. मात्र, या निर्णयावर मी असमाधानी असून उच्च न्यायालयात अपील करण्याच्या विचारात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!