Share

‘या’ देशाने केला कोरोनावर लस मिळाल्याचा दावा, संरक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

अंतरराष्ट्रीय : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देश लस शोधत आहेत. या लस शोधण्याच्या प्रक्रियेत आता इस्त्राईलही उतरला आहे. त्यात आता इस्त्राईलने मोठे संशोधन करून लस मिळाली असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे ही माहिती इस्त्रायली संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.

इस्रायल जगातील अशा देशांमध्ये सामील झाला आहे जो कोव्हिड-19विरुद्धच्या युद्धात आशेचा किरण दाखवत आहे. एप्रिलमध्ये इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी कोरोना लसीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर आता इस्त्रायली संरक्षणमंत्री आणि इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने दिलेल्या निवेदनात कोरोनाच्या लसीबाबत वक्तव्य केले आहे.

संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट म्हणाले की, कोरोना विषाणूचा नाश करण्यारी कोरोना लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे सांगितले आहे. तसचे, इस्रायलनं तयार केलेली ही लस कोरोनावर हल्ला करून रुग्णांच्या शरीरातून त्याचा प्रादुर्भाव कमी करेल. तसेच, या लसीचा शोध टप्पा संपला असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मदतीनं अॅंटीबॉयटिक्स तयार केले जातील.

दरम्यान इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च हे एक गुप्त युनिट आहे. ही लस अॅंटीबॉयटिक्स विकसित करते जी कोरोनाव्हायरसवर मात देण्यासाठी उपयोगी असतील. इस्रायलचा असा दावा आहे की ते लवकरच आपल्या तंत्रज्ञानाने कोरोनाला पराभूत करतील. याआधीही इस्त्रायली कंपनीने स्वस्त व्हेंटिलेटरही तयार केले होते. स्पिकिंग व्हेंटिलेटर देखील तयार केले गेले आहे. याच्या मदतीनं इस्रायल दररोज 10 हजार चाचण्या करत आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!