Share

कोरोनाचा विळखा झाला आणखी घट्ट, राज्यात २२७ पोलीस करोना बाधीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच राज्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात २२७ पोलीस करोना बाधीत(शुक्रवार पहाटे चारपर्यंतचा आकडा) झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील ३० अधिकारी, अंमलदार बरे झाले आहेत. यामध्ये १९४ जणांंवर सध्या उपचार सुरू असून उपचार आहेत.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, टाळेबंदी सुरू झाल्यापासून प्रतिबंधात्मक उपाय धुडकावणाऱ्याविरोधात राज्यभरात ८७,३९१ गुन्हे नोंद करण्यात आले, ५०८२७ वाहने जप्त करण्यात आली, तीन कोटींहून अधिक रक्कमेचा दंड आकारण्यात आला. या कालावधीत पोलिसांवरील हल्ल्याचे १६७ गुन्हे नोंद केले गेले, ६२७ आरोपींना बेड्या ठोठण्यात आल्या.

दरम्यान, हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान,कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!