Share

नाशिक जिल्ह्यातील 99 पॉझिटिव्ह,676 संशयीतांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, मृतांची संख्या 08

Published On: 

नाशिक : आज सायंकाळी 6 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत कोरोना संसर्गाबातचा अहवाल एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये घोषित करण्यात आली आहे; या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोना संसर्गितांची संख्या 99 असून त्यातील मालेगाव शहरातील 86 असून त्यातील 08 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच नाशिक शहरात 10 रूग्ण बाधित असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या ठिकाणाहुन बाधित झालेल्यांची संख्या 04 आहे. आजपर्यंत दोन कोरोना बाधित रूग्ण बरे झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

मांढरे म्हणाले, आजपर्यंत 951 संशयीतांचे 951 घशांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यातील 676 लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असून 99 लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मालेगाव महानगर पालिका क्षेत्रातील 236 संशयीतांच्या 236 इतक्या घशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 144 लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर 84 लोकांचे अहवाल हे पाझिटिव्ह आले होते. आजपर्यंत मालेगाव मध्ये 08 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यु झाला आहे.

नाशिक शहरातील 314 लोकांच्या घशांचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील 287 नमुने निगेटिव्ह आले असून त्यातील 10 इतके पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या 04 लोकांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.(सदरची आकडेवारी ही सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त जिल्हा सामान्य रूग्णालय, नाशिक यांच्या अहवालानुसार आहे.)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!