🕒 1 min read
दिल्ली : कोरोना महामारीच्या काळात लस घेणे हाच एकमेव उपाय होता. त्यामुळे लवकरात लवकर देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहचवणे अगत्याचे होते आणि त्यामुळे देशात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम हा भारतात राबवण्यात आला होता. आता भारतात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे. जगामध्ये सर्वात पहिले चीनने हा आकडा पूर्ण केला होता त्यानंतर भारतात या प्रकारचा विक्रम पूर्ण करण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की ज्यांचे लसीकरण अजून झालेले नाही त्यांनी होईल तेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण करावे व भारताच्या ऐतिहासिक कार्यक्रमात योगदान द्यावे. दरम्यान ,भारतात लसीकरणाअंतर्गत दिलेले १०० कोटी डोसचा विक्रम साजरा करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देश वैक्सीन शतक बनाने के करीब है।
इस स्वर्णिम अवसर के सहभागी बनने के लिए देशवासियों से मेरी अपील है कि जिनका वैक्सीनेशन बाकी है वो तत्काल टीका लगवाकर, भारत की इस ऐतिहासिक स्वर्णिम टीकाकरण यात्रा में अपना योगदान दें।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 20, 2021
या मध्ये लाल किल्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री हे कैलाश खेर यांचे गाणे आणि दृक्श्राव्य फिल्मचे उद्घाटन करतील तसेच देशातील रेल्वे, मेट्रो स्टेशन, बस स्टॅन्ड, विमान तळे,जहाजावर अश्या अनेक ठिकाणी या संदर्भाची माहिती देण्यात येईल अशी माहिती मंडाविया यांनी दिली. १०० कोटीचा लसीकरणाचा आकडा पूर्ण होईल त्या अनुषंगाने स्पाईस जेट कंपनीने आपल्या सर्व कंपनीतील कर्मचाऱ्यांना विशेष गणवेश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- जेम्स पॅटिन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली तडकाफडकी निवृत्ती
- ‘पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होते, वर्तमानात महत्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही महत्वपूर्ण राहतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
