Share

पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपचा कारभारीच ठरेणा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदासाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुका पार पडेपर्यंत जगताप यांनाच हे पद सांभाळण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मधल्या काळात शहराध्यक्षपदाचा विषय थंडावला होता. मात्र, या पदासाठी प्रबळ इच्छुक असणाऱ्या ११ पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र आता चांगलीच चढाओढ सुरू आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आता तयारी सुरू केली.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद हे पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले पद असून पक्षाचे दोन्ही आमदार शहराध्यक्षपदासाठी अनुत्सुक आहेत. निवडणुका पार पडल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम निर्णायक टप्प्यावर आला आहे. लक्ष्मण जगताप पुन्हा शहराध्यक्ष व्हावेत, यासाठी एक गट प्रयत्नशील आहे. मात्र, ते स्वत: पुन्हा शहराध्यक्ष होण्यास इच्छुक नाहीत. दुसरे आमदार महेश लांडगे यांनाही शहराध्यक्षपदात स्वारस्य नाही.

लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक उमा खापरे, राजू दुर्गे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी ११ जणांनी या पदावर दावा केला आहे. मात्र स्थानिक पातळीवर एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठींकडून एखाद्या नावावर थेट शिक्कामोर्तब केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1205741834384752641?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1205741132816109569?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!