🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मंत्रालयात एका महिलेने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळण्यास उशीर झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र जाळ्यामध्ये अडकून पडल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मागील १५ दिवसांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे काम वेगाने सुरू असून २५ नोव्हेंबर, २०१९ पासून १०६ प्रकरणात तब्बल ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. याशिवाय इअतर योजनांद्वारेही रुग्णांना एकूण ४९५ प्रकरणात मदत करण्यात आली आहे. मदत निधी विभागाकडे येणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून तातडीने रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे २५ 5 नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यासाठी कालपर्यंत ५८७ अर्ज आले आहेत. यापैकी जवळपास ४९५ प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे. अशी माहितीही विभागाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1205765921656098816?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205768208113815553?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
