मुंबई : सद्या महागाईमुळे सामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा प्रसार देशात होताच, या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अचानकपणे टाळेबंदी करण्यात आली. या ताळेबंदीमुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले. त्यामुळे सामन्यांना आपला रोजगार गमवावा लागला. २०२० चं स्वर्गीय डॉ. अब्दुल कलाम यांचं व्हिजन पूर्ण करू पाहणाऱ्या मध्यमवर्गाला तर इकडं आड तिकडं विहीर अशा प्रस्थितीमधून जावं लागत आहे.
कर्जाचा बोजा वाढलेल्या जनतेला आता पेट्रोलच्या महागाईचा फटका सोसावा लागत आहे. हळूहळू वाढ होत पट्रोल आता नव्वदी पार गेलं आहे. त्यामुळे आर्थिक हालापेष्टा वाढतच आहेत. आजही राज्यात पेट्रोल नव्वदी पारचं असलेलं पाहायला मिळालं. आज मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर 90.34 रुपये, तर डीझेल 80.51 रुपये प्रति लीटर आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत असून प्रति बॅरल 30 टक्क्यांनी वाढ होऊन 51 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. यामुळेच पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत असून येत्या काळात पेट्रोल शंभरी गाठू शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रातील सर्वात जास्त पेट्रोलचा भाव परभणीमध्ये नोंदवण्यात आला. परभणीमध्ये सर्वात महाग म्हणजे 92.76 रुपये प्रति लीटरच्या दराने पेट्रोल मिळत आहे. २०१० पासून पेट्रोलच्या किंमती या तेल कंपन्या ठरवतील असा अधिकार देण्यात आला. तर, यानंतर एप्रिल 2017 मध्ये पेट्रोल आणि डीझेलची किंमत रोज निश्चित केली जाईल, असा निर्णय झाला. यामुळेच पेट्रोलसह डिझेलच्या भावात रोज चढउतार पाहायला मिळत असतो.
महत्वाच्या बातम्या
- ‘नो मराठी, नो एमेझॉन’; मराठी वापरासाठी मनसेचा आक्रमक पवित्रा
- …तर जानेवारीमध्येच महाराष्ट्रात कोरोना लसीकरण सुरु करू : आरोग्यमंत्री राजेश टोपे
- अजित पवारांमध्ये जर एवढी ताकद असती तर ‘तेव्हा’ त्यांना आमदार टिकवता आले असते : पाटील
- पुढील दोन वर्षात देशाची टोलधाडीतून होणार मुक्तता; गडकरींनी दिली माहिती
- कोण संजय राऊत? चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

