🕒 1 min read
नगर : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार पारनेर तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या पारनेर तालुक्यात चोंभूत, पाडळी आळे, भाळवणी आदि मुख्य ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. पारनेर मध्ये मोठ्या प्रमाणात चोंभूत(ता.पारनेर ) -जांबुत (ता. शिरूर )रस्त्यावरून मोठया प्रमाणात पुणे, मुंबई मार्गे चोरटी चालत असल्याने पंधरादिवसांपूर्वी चोंभूत याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी मुळे सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून अतिरिक्त प्रवाशी वाहनांना लगाम बसला आहे.
दरदिवशी एक पोलीस व एक होमगार्ड कर्मचारी नेमून विना अत्यावश्यक वाहनावर कायदेशीर कारवाई करत आहेत.दि.27 पासून अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक नियम कडक केल्याने ज्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांनी ऑनलाईन पास काढले आहेत अश्या वाहनांनाच जिल्हा प्रवेश देण्यात येणार आहे अशी माहिती पारनेर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

