मुंबई : मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्ट पासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरु करतील असा इशारा भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला होता. परंतु काही कारणास्तव भाजपने हे आंदोलन आज केले नाही. परंतु आता आंदोलन न केल्याने कॉंग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.
ब्रिटिशांवरुद्ध केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून भाजपने पळ काढला होता. भाजप तेव्हाही प्रामाणिक नव्हता आणि आताही नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. भाजपचा दुटप्पीपणा ओळखून असलेली जनता आज भाजपसोबत नसून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. भाजप जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते भाजपमध्ये एकट्याने आंदोलन करण्याची क्षमता नाही असा घणाघातही सचिन सावंत यांनी भाजपवर केला आहे.
.@BJP4Maharashtra ने २ आॅगस्टला जाहीर केलेल्या सविनय नियमभंग आंदोलनातून पळ काढला. ब्रिटिशांविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन देश करत होता तेव्हाही पळ काढला होता. प्रामाणिकपणा तेव्हाही नव्हता आताही नाही
जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते. दुटप्पी भाजपाला ओळखलेली जनता आमच्याबरोबर आहे https://t.co/OP0fIc7APU pic.twitter.com/MoQqAv5JeQ— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 3, 2021
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपच्या दुटप्पीपणावर भाष्य करत निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हास्यास्पद तर आहेच परंतू अश्चर्यकारक निश्चित नाही. याचे कारण असे की सविनय नियमभंग ज्यावेळेला या देशामध्ये स्वतंत्रतापुर्व कालावधीमध्ये स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन होत होते त्यावेळेला यांनी पळ काढला होता. त्यामुळे भाजपकडे अनुभव नाही. ती क्षमता नाही. धैर्य नाही, त्या संदर्भातील साहस नाही आहे. ब्रिटिशांबरोबर त्या ठिकाणी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा पळ काढणारे ही लोक आता ते करु शकत नाहीत. असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पूरग्रस्तांना तातडीची मदत अजूनही मिळाली नाही तर पॅकेजचं काय?,’ आशिष शेलार यांची टीका
- ‘चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली’, मेहबूब शेख यांची पोलिसांत तक्रार
- ‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध
- मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती


