Share

आयपीएल २०२१ च्या उर्वरीत सामन्यासाठी ‘या’ मालिकेचा बळी देणार बीसीसीआय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यादरम्यान भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. आयपीएल स्पर्धा ही इतिहासात पहिल्यादांच अर्ध्यातच स्थगित करण्यात आल्याने उर्वरीत स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले.

भारतीय आणि इतर आंतरराष्ट्रीय संघाचे आगामी वेळापत्रक पाहता आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने हे संप्टेंबर महिन्यात आयोजीत करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. मात्र यासाठी बीसीसीआयने याकाळात पुर्वनियोजीत दक्षिण अफ्रिका संघासोबतची टी-२० मालिका रद्द करण्याचा विचार करु शकते. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आयपीएल स्पर्धेपेक्षा चांगली तयारी होऊ शकत नाही असे बीसीसीआयचे मत आहे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणारी टी -२० मालिका रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.

येत्या २ जुन रोजी भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेट संघ २ जुन रोजी एकाच विमानातुन इंग्लंडला रवाना होतील. या दौऱ्यात भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!