Share

कॉंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या घरावर झाला हल्ला ; अत्यंत दुर्दैवी प्रकार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते असलेले अधीर रंजन चौधरी यांच्या घरावर आज काही अज्ञात हल्लेखोरांनी घरामध्ये घुसखोरी केली आणि अधीर रंजन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. अधीर रंजन यांना मारहाण झाल्याचे अद्याप समजलेले नसले तरीही हल्लोखोरांना रोखणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचे अधीर रंजन यांच्या कार्यालयाकडून मात्र सांगण्यात आलेले आहे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि संसदेमध्ये सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर आज काही अज्ञातांनी हल्ला केला. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली.

अधीर रंजन चौधरींच्या घरी अज्ञातांनी घुसखोरी करून कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्याच्या अधिवेशनाच्या दिवशी उपस्थित होण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर भाजपला सुद्धा याचा विचार करावा लागेल.

अधीर रंजन हे लोकसभेत सत्ताधारी भाजपाला घेरण्याचे काम करतात. त्यांनी महागाईवरून आणि अर्थव्यवस्था कोलमडल्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला असे हिणवले होते. यावरून संसदेत गदारोळही झाला होता. यावर अधीर रंजन यांनी माफीही मागितली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!