Share

पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये : सदाभाऊ खोत

Published On: 

नागपूर : शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम किमान पाचशे रुपये देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश देण्यात येतील, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.

राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही एक रुपये मिळाल्याचे प्रकार घडले असल्याचा मुद्दा सदस्यांनी 293 अन्वये प्रस्तावावरील चर्चेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना खोत बोलत होते.  खोत म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत गेल्या चार वर्षात राज्यात 11 हजार 263 कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. यापुढील काळात 11 हजार 900 कोटी रुपयांच्या पीक विम्याची रक्क्म शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी कापसावरील बोंडअळी, धान्यावरील मावा-तुडतुड्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारणाकडून 3 हजार 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने तीन टप्प्यात मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत एक हजार नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, एकनाथ खडसे आदी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!