मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज पार्टीवर धाड टाकली होती. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे वारंवार एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.
यातच काही दिवसापूर्वी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवत हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी मिळवून देण्याची मागणी केली आहे. या मौल्यवान तंबाखूच्या निमित्ताने तरी महाराष्ट्रातील शेतकरी श्रीमंत होईल, असा खोचक टोला खोत यांनी लगावला होता.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडली होती. एनसीबीला तंबाखू आणि अमली पदार्थातील फरकही कळत नाही, अशी टीका एनसीबीवर केली होती. मात्र तेव्हा शरद पवारांनी मलिक यांच्या जावयाकडे एक प्रकारची हर्बल वनस्पती सापडल्याचं विधान केले. त्यांच्या या विधानाची प्रचंड चर्चा झाली.
यावरूनच आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं या पत्राची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही – सामंत
- मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही खरी बातमी असावी; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन भातखळांची टीका
- आरएसएस विरोधात वक्तव्य केल्याने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
- अखिलेश यादव आणि प्रियंका गांधींची विमानामध्ये भेट; नेमके काय झाली चर्चा?
- नाशिकमध्ये यंदा शिवसेनाच सत्तास्थानी असणार; संजय राऊतांचा विश्वास

