Share

आयपीएलच्या १२व्या मोसमाला उद्यापासून सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: इंडिअन प्रीमियर लीग च्या १२ व्या मोसमाला उद्यापासून चेन्नईत सुरुवात होत आहे. पहिला सामना हा गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चैलेंजर्स बेंगलोर या संघात होणार आहे. १२व्या मोसमासाठी सगळ्याच संघांनी जोरदार तयारी केली आहे. डिसेंबर मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत खेळाडूंसाठी बोली लावून दर्जेदार खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सगळ्याच संघांनी प्रयत्न केले. संघमालकांनी रणनीती नुसार संघ तयार केले आहेत. गेल्या ११ मोसमात प्रेक्षकांनी आयपीएलला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास चेन्नईने मागच्या वर्षी विजेतेपद पटकावले होते. तर बेंगलोरच्या संघाला त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. चेन्नईच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो यासारख्या T20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा भरणा आहे. तर बेंगलोरच्या संघात कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, उमेश यादव, टीम साऊथी अश्या खेळाडूंचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या सामन्यामध्ये या प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर सगळ्याचं लक्ष असेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!