मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप हा चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच शिवसेनेने त्यांच्या ‘सामना’ अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली होती. त्या उत्तर देत पाटलांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पात्र लिहिले होते. त्या पत्रावरून पीएमसी बँक घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप मान्य नाही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. आपण पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असून त्यांची तेवढीच किंमत आहे, असेही यावेळी ते म्हणाले होते. त्यावर उत्तर देत पाटील यांनी राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही अशी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळींनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.
याविषयी राऊतांवर खोचक टीका करत ‘राऊतांनी किंमत थोडी वाढवायला पाहिजे होती’ असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर उत्तर देत राऊत म्हणाले आहेत की,’प्रश्न माझ्या किंवा त्यांच्या पैशाचा नाही. अब्रुची आणि स्वाभिमानाची किंमत होत नाही. तुम्ही खोटं बोललात तुमच्याकडे माहिती नाही. तुम्ही महाराष्ट्रासह सगळ्यांची बदनामी करत आहात. तुमचा तो राजकीय धंदा आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला कोर्टात खेचून जाब विचारावा लागेल. रुपया सव्वा कोटी हे आकडे फक्त दाखवायला असतात. परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक शिवसैनिकाचा एक सन्मान आहे. त्यांच्यावर ते टीका करु शकत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते कुठून आले आहेत ते आम्हाला माहिती आहे. योग्यवेळी ती बाहेर काढू’ असा इशाराही यावेळी राऊत यांनी दिला.
दरम्यान, पाटील यांना पुन्हा एकदा उत्तर देत राऊत म्हणाले की,’प्रश्न पैश्यांचा नाही तर स्वाभिमानाचा आहे. ५०० कोटींचा दावा ठोकू किंवा १००० कोटींचा ठोकू पण स्वाभिमानाची किंमत असते. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला त्यांचे पैसे नकोत. त्यांच्या पैशांवर आमचे घर चालत नाही. तसेच आम्ही सामान्य लोकं आहोत. आम्ही आमचे पैसे कमवतो आणि खातो हे त्यांनाही माहिती आहे. त्यांना सगळीकडे पैसेच दिसतात. त्यांचा पक्ष पैसेवाल्यांचा पक्ष आहे’. असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा राजकीय लाभ कोणाला होणार ?
- ‘पुणे महापालिकेत प्रभाग कितीचा आणि कसाही झाला तरी पुणेकरांचा कौल भाजपच्याच बाजूने राहणार’
- शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
- ठरलं ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कुठे बहुसदस्यीय तर कुठे एक सदस्यीय
- ‘नव्या प्रभाग रचनेचा आमच्यावर काहीही फरक पडणार नसून पुणेकरांना आमच्या कामावर विश्वास आहे’


