Share

ठाकरे दिलेला शब्द पाळतात, पालकमंत्र्यांचा संभाजीनगरचा नारा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शब्दांचे सच्चे आहेत. दिलेला शब्द पाळणे हि ठाकरे घराण्याची परंपराच आहे. त्यामुळे संभाजीनगर शहराच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द ते पाळतीलच. महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात नाविन्यपूर्ण प्रकल्प होत आहेत. कचरा मुक्त आणि चांगल्या रस्त्यांनी युक्त असे शहर आपल्याला बनवायचे आहेत. यात संभाजीनगरकरांचा मोठा सहभाग आहे. विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. शहराचा उल्लेख संभाजीनगर करत ठाकरे दिलेला शब्द पाळतातच यातून नामांतराबाबत सूचक इशारा त्यांनी दिला.

मागील दोन वर्षांपासून नियोजित असलेल्या पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनास अखेर मुहूर्त मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सकाळी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न झाले. पडेगाव येथील लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी कांचनवाडी येथील नियोजित कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती या कामाचे उद्घाटन केले. याठिकाणी शहरातील हॉटेल्स, भाजीमंडईमधून निघणाऱ्या सुमारे ४० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या १०० बसथांब्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात रेल्वे स्थानकाजवळील बसस्टॉपचे उद्घाटन केले.त्यावेळी बोलतांना मास्क न घातलेल्या उपस्थितांचे त्यांनी कान टोचले.

यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, आ. अंबादास दानवे, खा. भागवत कराड, खा. इम्तियाझ जलील, आ. अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल तसेच मनपा अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!