Share

‘दहशतवादाला कोणताही धर्म नसतो,पाकिस्तानसोबत चर्चा करा’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – काल जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू आणि कॉंग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी अक्कल पाजळली असून ज्या पकड्यांनी ४० हून अधिक जवानांचा बळी घेतला त्या पाकिस्तानसोबत चर्चेतून कायमचा तोडगा काढला पाहिजे असा फुकटचा सल्ला दिला आहे.

‘या हल्ल्याचा निषेध आहे. हा भ्याड हल्ला आहे. चर्चेतून यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे. कधीपर्यंत हा रक्तपात सुरु राहणार आहे ? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही’, असं त्यांनी म्हटलं आहे.दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो असं म्हणत सिद्धू यांनी फक्त चर्चेने पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारले जातील असं म्हटलं आहे.

दरम्यान,पाकिस्तानकडून मात्र स्वतःचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. भारतात झालेला दहशतवादी हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून, या आरोपांशी काहीही पडताळणी न करता पाकिस्तानचं नाव जोडू नका असं म्हटलं आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात हे विधान करण्यात आलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!