Share

भयंकर… आईसह बसलेल्या तीन वर्षीय मुलाला बिबट्याने नेले उचलून!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पाथर्डी तालुक्यात मागील आठवड्यात मढी येथून एक व त्यानंतर केळवंडी येथून एक अशा दोन बालकांना बिबट्याने उचलून नेत ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पाथर्डी शहरासह तालुक्यात बिबट्याची प्रचंड दहशत पसरली असून नागरिक भयभीत झाले आहेत.

आता पुन्हा पाथर्डी तालुक्यातील शिरापूर गावाअंतर्गत तारकनाथ वस्तीवरील सार्थक संजय बुधवंत या तीन वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्या तिन वर्षाच्या सार्थकला पळवून घेऊन जात असताना आई सुनंदाने बिबट्याचे शेपूट ओढून धरले मात्र आईचे हे प्रयत्न तोकडे पडले.

तालुक्यातील मढी, केळवंडी नंतर आता शिरापूर येथील डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या संजय बुधवंत यांचा तीन वर्षाचा मुलगा सार्थक याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे. सार्थकची आई त्याला घेवून पडवीत बसली होती.

त्याच दरम्यान बिबट्याने झडप घालून सार्थकला उचलून नेले. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधाशोध सुरू केली. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. काल दुपारपर्यंत सार्थकचा शोध घेणे सुरू होते. शोध मोहिमेत वनविभाग, पोलीस कर्मचारी व शेकडो तरुण सहभागी झाले होते.

दरम्यान, पाथर्डी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने विविध भागात तब्बल अकरा ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आले नसल्यामुळे वनविभागाच्या कामकाजाबाबत तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. पाथर्डी तालुक्यात बिबट्याचे विविध व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागले आहेत.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी घराबाहेर निघण्यास देखील नागरिक घाबरू लागले आहेत. पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून या नरभक्षक बिबट्याला त्वरित पकडण्याची मागणी आता पाथर्डी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!