मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाऊसातील साताऱ्यामधील ऐतिहासिक भाषणाला दोन वर्ष पूर्ण झाली. सुप्रिया सुळेंनी फेसबुक पोस्ट शेअर करत या आठवणींना उजाळा देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी पवारांच्या भाषणाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्याच्या परिस्थितीबाबत प्रश्न विचारले आहे.
निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ‘काय झालं जर पवार साहेबांच्या पावसाच्या सभेला २ वर्षे पूर्ण झाली. या २ वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला हे पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्र १ नंबर फक्त कोरोनामध्ये, असे असंख्य विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रमध्ये महत्त्व असतं,’ अश्या शब्दात त्यांनी शरद पवारांवर वार केला.
काय झालं जर पवार साहेबांच्या पावसाच्या सभेला २ वर्षे पूर्ण झाली. या २ वर्षात महाराष्ट्र किती वर्ष मागे गेला हे पण सांगा, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? महाराष्ट्र १ नंबर फक्त कोरोना मध्ये, असे असंख्य विषय हाताळले असते तर पवार साहेबांचं महाराष्ट्रमध्ये महत्त्व असतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 19, 2021
राज्यात मागील वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. अनेकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला. तसेच बेरोजगार होण्याचे प्रमाण देखील वाढले. सामान्य नागरिकांच्या आर्थिक संकटात वाढ झाली. तर दुसरीकडे, महाराष्ट्रातील अनेक भागाला पूराचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यावरूनच निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
दरम्यान, १८ ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात शरद पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान मुसळधार पावसात शरद पवारांनी भाषण थांबवले नाही. पावसात भिजत पवारांनी भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली होती. ‘गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’ असे भावनिक आवाहनही त्यांनी केले होते. यानंतर सातारकरांची पूर्णपणे साथ पवारांना मिळाल्याचेही दिसले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’

