Share

वाळू वाहतुकीसाठी पैसे मागणारा परभणीतील तहसीलदार एसीबीच्या ताब्यात

Published On: 

परभणी : परभणीच्या प्रशासनात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. सोनपेठ येथील तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना ५५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. वाळूच्या ट्रकची वाहतूक करताना कुठलीही कारवाई न करण्यासाठी त्यांनी मासिक हप्ता म्हणून रक्कम मागितली होती.

सोनपेठ तहसील कार्यालयातील संगणक ऑपरेटर सय्यद इसाक सय्यद रहीममार्फत लाचेचे ५५ हजार स्वीकारले जात होते. एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. सोनपेठ तालुक्यातील रेती वाहतुक करणाऱ्या व्यावसायिकास आपले वाहन चालवण्यासाठी व त्यावर कारवाई न करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याबाबत व स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तहसीलदार व त्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला ताब्याक घेतले.

रेती व्यावसायिकांनी लाचलुचपत खात्याच्या पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यांनी तहसीलदारांनी लाच मागितल्याची व आपली देण्याची इच्छा नसल्याचे तक्रार दिल्याने एसीपी पाटील यांनी सदरील प्रकरण हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागास हस्तांतरित केले. यावरून सोमवारी तक्रारदाराने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तहसीलदारांना भेटुन लाचेची रक्कम स्वीकारण्याची विनंती केली.

त्यावरून तहसीलदार यांनी आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यास रक्कम स्वीकारण्यास सांगितले. कंत्राटी कर्मचाऱ्याने रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्याने तहसीलदार डॉ. आषिशकुमार बिरादार व कर्मचारी सय्यद ईसा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध ५५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!