Share

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तहसीलदार छाया पवार निलंबित

Published On: 

🕒 1 min read

जालना : जगभरात थैमान घालत असलेला कोरोना मराठवाड्यात देखील चांगलाच पसरत आहे. शासनाने या काळात काही नियम घालून दिलेले असून सर्वांवरच या नियमांचे पालन करण्याचे बंधनकारक आहे. मात्र बदनापूर च्या तहसीलदार यांनी नियमांचे उल्लंघन केल्याने आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

कोव्हीड19 या आपत्ती कालावधीमध्ये मुख्यालयी न राहणे तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे बरेच रुग्ण आढळुन आलेले आहेत. त्यामुळे औरंगाबादचा समावेश रेडझोनमध्ये झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथुन ये-जा केल्यास जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड-19 विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने तहसिलदार, बदनापुर यांनी मुख्यालयी उपस्थित राहून अत्यावश्यक कामे नियमितपणे पार पाडणे आवश्यक होते.

मात्र तहसिलदार, बदनापुर मुख्यालयी राहत नसल्यामुळे कोव्हीड19 बाबतचे विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष, अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनाधिकृत वाळुसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीमध्ये दुर्लक्ष करणे या कारणावरुन बदनापुरच्या तहसिलदार छाया पवार यांना आज दि. 30 एप्रिल, 2020 रोजी जिल्हाधिकारी, जालना यांनी निलंबित करत अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.

निलंबनाच्या काळामध्ये श्रीमती पवार यांना उप विभागीय अधिकारी कार्यालय, जालना हे मुख्यालय देण्यात आलेले असुन तहसिलदार, बदनापुरचा पदभार पुढील आदेशापर्यंत नायब तहसिलदार (निवडणूक) दिलीप शेनफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!