🕒 1 min read
मुंबई: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. टीम इंडियाचा हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. उभय संघांमध्ये सुरुवातीला एकदिवसीय मालिका, नंतर टी-20 मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार 27 आणि 29 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे दोन एकदिवसीय सामने खेळवले जातील. त्यानंतर तिसरा एकदिवसीय सामना आणि टी-20 मालिकेतील पहिला सामना मानुका ओव्हल म्हणजेच कॅनबरा येथे खेळवला जाईल. शेवटचे दोन टी-20 सामने पुन्हा सिडनी येथे खेळवले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्सच्या सरकारमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंना क्वारन्टाईन करणे आणि त्यांना ट्रेनिंगच्या सर्व सुविधा पुरवण्याबाबतचा करार झाला आहे.
अॅडलेड येथून कसोटी मालिकेस प्रारंभ करण्यात येणार असून उभय संघांमधील कसोटी मालिका पिंक बॉलद्वारे खेळवली जाणार आहे. म्हणजेच हे सामने डे-नाईट असतील. 17 ते 21 डिसेंबरदरम्यान अॅडलेड येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. अॅडलेडचं मैदान हे बॉक्सिंग डे टेस्टचे बॅकअप व्हेन्यू असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेलबर्नच्या मैदानावर यंदा कसोटी सामना खेळवण्यात अडचणी येतील यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅकअप तयार ठेवला आहे. या मालिकेतील तिसरा सामना 7 ते 11 जानेवारी 2021 या कालावधीत सिडनी येथे खेलवला जाईल, तर मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 ते 19 जानेवारी 2021 यादरम्यान ब्रिस्बेन येथे खेलवला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
- प्रवाश्यांना मोठा दिलासा; नांदेड-पनवेल व्हाया लातूर विशेष रेल्वे सेवा झाली सुरु
- नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करा; दानवेंचा राष्ट्रवादीला मोलाचा सल्ला
- दमानिया यांच्या गंभीर आरोपांवर खडसे सोडणार आज मौन?
- ‘राष्ट्रवादी सर्व भ्रष्ट नेत्यासाठीचे माहेरघर, त्यामुळे खडसेंचा पक्ष प्रवेश आश्चर्यकारक नाही’
- पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ‘या’ तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन


