Share

आयटीआर भरण्यासाठी करदात्यांची धावपळ; मुदतीनंतर भरावा लागणार दंड !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात सरकारकडून बँकांना तीन महिन्यांसाठी नागरिकांच्या कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे आयकर विभागाने देखील आयटी रिटर्न भरण्याची मुदत सप्टेंबर आणि नोव्हेंबर अशी दोनदा वाढवून दिली होती. त्यानंतर आता 2019-20 साठी आपले रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत जमा करु शकतात असे यावेळी सांगण्यात आले होते.

त्यामुळे आता अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर आधी शेवटच्या ४ दिवसांत आयकर विवरण सादर करण्यासाठी सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची धावपळ सुरु आहे. अन्यथा करदात्यांना बिलंब शुल्क भरावे लागणार आहे.

तर अद्याप देखील अनेकांनी आयकर विवरण पत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेकांना आणखी मुदत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र विलंब शुल्कांपासून बचाव करण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी करदात्यांनी आयटीआर रिटर्न सादर करणे आवश्यक आहे,

दरवर्षी ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा करोनामुळे मुदत वाढवून मिळाली होती. तर आताज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांहून कमी आहे आणि अशा करदात्याने ३१ अंतिम मुदतीत विवरण सादर केले नाही तर त्याला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत आयटीआर सादर करणाऱ्या करदात्याला किमान १० हजारांचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे, असं मत टॅक्सटूविन या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सोनी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!