टीम महाराष्ट्र देशा : देशातील कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता टाटा उद्योग समूह पुन्हा देशाच्या मदतीला धावले आहेत. त्यामुळे सामाजिक दायित्वाची जाण असलेल्या टाटा ट्रस्टने आपली जबाबदारी म्हणून पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम हाती घेतलं आहे.
याबाबत माहिती अशी कि १५० कोटी रुपयांचं वैद्यकीय साहित्य टाटा ट्रस्टकडून देशभरात एअरलिफ्टच्या माध्यमातून देशभरात पोहोचवलं जाईल. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या मदतीनं ही मदत पोहोचवली जाण्यात येणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टनं दिली आहे.
टाटा ट्रस्टकडून कव्हरऑल्स, मास्क, ग्लोव्ज यांचा समावेश असलेली पीपीई किट्स, एन ९५/केएन ९५ मास्क आणि सर्जिकल मास्क देशभरात पोहोचवले जाणार आहेत. ‘येत्या काही आठवड्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये वैद्यकीय साहित्य पाठवलं जाईल. या साहित्याचं मूल्य १५० कोटी रुपये इतकं असेल,’ अशी माहिती टाटा ट्रस्टनं प्रसिद्धीपत्रकातून दिली.
Tata Trusts airlifting critical gear for India’s Covid-19 response.#TataInternational @airindiain @TataCompanies pic.twitter.com/e4GBLjpVsk
— Tata Trusts (@tatatrusts) April 16, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

