Share

‘या’ बँकेच्या ऑफरमध्ये घेऊन या तुमच्या स्वप्नातील टाटा सफारी

Published On: 

नवी दिल्ली : एक काळ होता तेव्हा टाटा सफारीचं वादळ संपूर्ण भारतभर घोंगावत होत. सफारी म्हणजे एक शान होती मात्र जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा मार्केट मधील स्पर्धेत सफारी मागे पडत गेली. आजही ज्यांच्याकडे सफारी आहे त्यांचा वेगळाच रुबाब असतो. कालांतराने स्कॉर्पिओ, इनोव्हा, फॉर्च्युनर, महिंद्रा एक्सयूव्ही अशा गाड्यांच्या पर्यायांमुळे सफारी मागे पडली.

टाटाने सफारी बनवणं देखील बंद केली. मधल्या काळात सफारी स्टॉर्म बाजारात आली होती. या गाडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता टाटाने पुन्हा एकदा नव्या पद्धतीने बाजारात आपली छाप पडली आहे. हॅरिअर, नेक्सोन, अल्ट्रोज अशा आधुनिक, स्टायलिश आणि सुरक्षित गाड्या लॉन्च केल्यानंतर ताटाला ग्राहकांनी चांगली पसंती दिली होती.

आता २०२१ मध्ये देखील टाटानेआपले मनसुबे जाहीर केले असून कित्येक पिढ्यांची आवडती सफारी नव्या रूपात आणि अत्याधुनिक सेवांसह लाँन्च करण्यात आली आहे. या गाडीचा बोलबाला सद्या सर्वत्र असून आता बुकिंग देखील सुरु झालं आहे. ग्राहक सध्या अवघे 30 हजार रुपये भरुन ही कार बुक करु शकतात. या गाडीचे विविध व्हेरियंट्समध्ये सादर केली जाणार आहे. आजपासून या कारच्या बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. तर २२ फेब्रुवारीपासून या गाडीची डिलिव्हरी सुरु करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ता गाडीची किंमत बेस व्हेरियंट साठी १५ लाख ते २२ लाख इतकी आहे. (एक्स शो-रूम किंमत शहरांप्रमाणे बदलू शकते )

दरम्यान, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेने एक जबरदस्त ऑफर दिलीन आहे त्यामुळे तुम्ही आत सहज टाटा सफारी घरी नेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही योनो एसबीआयवर टाटा सफारी बुक केली तर तुम्हाला कार लोन घेण्यासाठी आकर्षक संधी मिळणार आहे. एसबीआयने ट्वीट करून यासंबंधी माहिती दिली आहे. चला टाटा सफारीवर एसबीआयची खास ऑफर काय आहे ते जाणून घेऊया?

योनो SBI वर तुम्ही टाटा सफारी बुक केलीत तर तुम्हाला यामध्ये व्याजदरावरील 0.25 टक्के सवलत देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतीही प्रक्रिया शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. या व्यतिरिक्त योनो एसबीआय वर 100% फायनान्स पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एसबीआयने ट्विटरवर या ऑफरविषयी माहिती दिली आहे. यामध्ये #TATASafari # YONOSBI # YONO # CarLoan #Offers अशा हॅशटॅगसह हे ट्विट करण्यात आलं आहे. एसबीआयने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Bring home this beast. YONO SBI वर TATA Safari बुक करा आणि तुमच्या कार लोनवर आकर्षक फायदे मिळवा. विचार करणं थांबवा आणि आपल्या स्वप्नांच्या कारसह पुढे जा. आता डाउनलोड करा: https://sbiyono.sbi/index.html

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईटवर जा. यामध्ये काही नियम आणि अटीही देण्यात आल्या आहेत. त्या नीट वाचा. ही ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एसबीआय योनो अ‍ॅपवर लॉगइन करावं लागेल. दुकान आणि ऑर्डर विभागात नेव्हिगेट करा आणि त्यानंतर ऑटोमोबाईल विभागात जा आणि टाटा मोटर्सवर क्लिक करा.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!