Share

आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा 

Published On: 

🕒 1 min read

लातूर :- जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे पिक संरक्षक उपयायोजना प्राप्त होतात .

सध्यपरीस्थीतीमध्ये आंबा पालवीवरील तुडतुडयांचा प्रादर्भाव आढळुन आल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आंबा पालवीवरील फुलकिडयांनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १०लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

आंबा बागांमध्ये भुरी व करपा रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के हेक्झाकोनॅझोल ५ मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेडॅझीम १२% + मॅन्कोझेब ६३% १० ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातून फवारणी करावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!