Share

भारताचा पाकिस्तानवर विजय; तैमुरनेही दिल्या ‘हटके’ शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ICC Cricket World Cupमध्ये सुरु असलेल्या हायवोल्टेज सामन्यात भारतानं पाकिस्तानला धावांचे ३३७ आव्हान दिले. पावसामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार ५ षटकांत १३६ धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं मात्र त्यांचा खेळ २१२ धावांवर आटोपला. भारताने ८९ धावांनी विजय मिळवला.भारताला पहिलं यश मिळालं आहे.

या विजयानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर पाकिस्तानवर टीकेचा भडीमार होत आहे. मात्र या सगळ्या शुभेच्छांमध्ये एक क्युट फोटो समोर आलाय. या फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. हा फोटो आहे छोटा नवाब तैमूरचा.

स्टार किडमध्ये तैमूर हा हॉट फेव्हरेट मुलगा आहे. तैमूरच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये तो चर्चेत असतो. तैमूरचा नवा फोटो समोर आल्यास तो व्हायरल होण्यास वेळ लागत नाही हे आता सर्वश्रुत झाले आहे. मात्र आता याच तैमुरची चर्चा टीम इंडियाला शुभेच्छा दिल्याने चर्चेत आला आहे.

या फोटोत तैमूरने भारतीय क्रिकेट टीमची जर्सी परिधान केली असून तो भारतीय क्रिकेट टीमला सॅल्यूट करतोय. तैमूरचा हा क्युट फोटो सगळीकडे व्हायरल होतोय. करीना कपूर खान व करिश्मा कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करीत भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन केलंय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!