Share

तबलिगी मर्कझ : आठ इंडोनेशियन मुस्लीम धर्मप्रसारक ‘या’ मशिदीत बसले होते लपून

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो लोक उपस्थित होते. कोरोना विषाणूचा मोठा धोका निर्माण झालेला असताना शेकडो लोकांना एकत्र आणणे, ही अत्यंत बेजबाबदारपणाची कृती होती, असे सरकारने म्हटले आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे शेकडो लोकांचे जीव धोक्यात आले.

दरम्यान, ‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झालेले आठ इंडोनेशियन मुस्लीम धर्मप्रसारक हे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मशिदीत सापडले आहेत. नागिना भागातील या मशिदीतून त्यांना ताब्यात घेतले. बिजनौरचे पोलिस अधीक्षक संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी इंडोनेशियाच्या आठ धर्मप्रसारकांना ताब्यात घेतले असून ते १३ मार्च रोजी निझामुद्दीन येथील ‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झाले होते.

सर्व आठ जणांना विलगीकरण केंद्रात पाठवले असून त्यांची चौकशी चालू आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर ते ओडिशाला गेले व नंतर तेथून बिजनौरला आले. ते ओडिशात नेमके कुठे गेले होते याची माहिती घेण्यात येत आहे. मशिदीच्या पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!