Share

निसानची SUV निसान मॅग्नाइट भारतात लाँच ! ५ लाखांपेक्षा कमी आहे किंमत…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्लीः कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या दरम्यान उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी वाहनांचे उद्योगाला मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे यामध्ये कोरोनामुळे जीवितहानीसोबतच आता आर्थिक नुकसानही व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे भारतातल्या कार उत्पादक कंपन्यांनी कारचं उत्पादन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, महिंद्र एण्ड महिंद्र, मर्सिडिज बेन्झ आणि फियाट क्रिसलेर यांनी आपण कोरोनामुळे कार उत्पादन थांबवत असल्याचं सांगितलं होत.

मात्र आता या प्रक्रियेनंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेवून आज निसान इंडियाने भारतात आपली निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) ला लाँच केले आहे. या सब कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा लूक खूपच जबरदस्त आणि आकर्षक आहे.

मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात निसान मॅग्नाइट सुरूवातीची किंमत ४ लाख ९९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसानने आपल्या या कारला इंट्रोडक्टरी किंमतीत बाजारात उतरवले आहे. इंट्रोडक्टरी किंमतीचा अशा लोकांना मिळणार आहे. ज्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत गाडी बुक केली. यानंतर निसान मॅग्नाइट एक्स शोरूम किंमत ५.५४ लाख रुपये होणार आहे.

आज लाँच करण्यात आलेल्या निसान मॅग्नाइटला ११ हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुकिंग करता येवू शकते. मॅग्नाइट एसयूव्हीची टक्कर मारुती सुझुकी विट्रा ब्रीझा, हुंडाई वेन्यू, टाटा नेक्सन, फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा एक्स यु व्ही 300, टोयोटा अर्बन क्रुझर, होंडा डब्ल्यू आर ब व्ही या कारसोबत होणार आहे.

निसान मॅग्नाइट चे खास फीचर आहेत ज्यामध्ये निसान मॅग्नाइट में Bi Projector LED हेडलँम्प, LED DRL, LED इंडिकेटर, १६ इंचाची डायमंड कट अलॉय व्हील्स, अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टचे ८ इंचाचे चस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिले आहे, व्हाइस रिकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.
निसान एसयूव्हीला दोन पर्यायात आणले आहे. ज्यात एक नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन आणि एक टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. ज्यात नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन ९९९ सीसीचे मोटर देण्यात आले आहे जे 3,500 आरपीएमवर 96 Nm टॉर्क सोबत 6,250 rpm वर 71 bhp पॉवर देते. दुसरे इंजिन १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम चे टॉर्क जनरेट करते. त्यामुळे आता कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!