Share

Sushma Andhare | “अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला…”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार 

Published On: 

Sushma Andhare | मुंबई : भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचं चित्र आहे. आज नवी मुंबईत बोलताना चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लक्ष्य केल्यानंतर आता अंधारेंनीही त्यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना चिमटा काढलाय. “अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”, अशी बोचरी टीकाही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

 

काय म्हणाल्या होत्या चित्र वाघ?

त्या म्हणाल्या, “प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आमची नक्कल करून अंधारे टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. मात्र, मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावे. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत. आम्ही आमचे काम करत राहू. असे कितीही आडवे आले तरी आम्हाला फरक पडणार नाही. आम्हाला आमची कामे आहेत.”

“लोकांना लाभ मिळत आहे. लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. राज्य, केंद्र सरकार कित्येक योजना राबवत आहे. आता सर्वांनाच शेतकरी आठवत आहे. आता ते शाताच्या बांधावर जात आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षे ते झोपले होते. तेव्हा यांना कधी बळीराजाची आठवण आली नाही. १४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तेव्हा हे झोपले होते,” अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!