🕒 1 min read
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ऑनलाइन रिलीज होण्याची घोषणा झाली. हा चित्रपट ऑनलाईन नव्हे तर थिएटरमध्ये रिलीज करावा अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी केली. तरी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) रिलीज केला जाणार आहे.
गृहखाते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मस्ती आली आहे, निलेश राणेंचा घणाघात
24 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सर्वांना पाहता येणार आहे. म्हणजे हा फक्त सस्क्राइबरच नाही तर नॉन सस्क्राइबर प्रेक्षकांनाही ही फिल्म पाहता येणार आहे. ज्यांच्याकडे डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन नाही, त्यांनाही हा चित्रपट पाहता येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत घोषणा केली. विशेष म्हणजे मुकेश छाबडा यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतची ‘काय पो छे’ या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती, हा त्याचा पहिला चित्रपट. तर दिल बेचारा हा मुकेश छाबडा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट.
शिवसेनेला काँग्रेसची पर्वा नाही, ही कसली आघाडी? कॉंग्रेस नेत्याची शिवसेनेवर टीका
बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
